Home महाराष्ट्र आनंदाची बातमी ! मान्सून महाराष्ट्रात दाखल, 12 दिवस आधीच आगमन, पुणे मुंबईत...

आनंदाची बातमी ! मान्सून महाराष्ट्रात दाखल, 12 दिवस आधीच आगमन, पुणे मुंबईत कधी?

Breaking News | Monsoon 2025: The Southwest Monsoon has further advanced into some more parts of westcentral & eastcentral Arabian Sea, some more parts of Karnataka, entire Goa, some parts of Maharashtra, some more parts of westcentral and north Bay of Bengal, and some more parts of Mizoram, some parts of Manipur and Nagaland today, the 25th May 2025.

The Southwest Monsoon has further advanced into some more parts of Maharashtra

Monsoon 2025: शनिवारी मान्सून गोव्याच्या किनाऱ्यावर दाखल झाला होता. यांनतर मान्सून कोकणात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र, महाराष्ट्रात मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये राज्यात दाखल झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे राज्यात रविवारी (दि.25) आगमन झाले. हवामान खात्याकडून रविवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली. कालच मान्सून गोव्याच्या किनाऱ्यावर दाखल झाला होता. यांनतर मान्सून कोकणात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र, महाराष्ट्रात मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये राज्यात दाखल झाला आहे.

दरवर्षी मान्सून साधारणपणे 7 जूनच्या आसपास राज्यात दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सूनची एकूण आगेकूच पाहता पुढील काही तासांमध्ये मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होईल, असा अंदाज आहे. आज सकाळपासून मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरण आहे.

गोव्यात मुसळधार पाऊस कोसळत असून गोव्यातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आले आहे. गोव्यात मुसळधार पाऊस कोसळत असून गोव्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Breaking News: The Southwest Monsoon has further advanced into some more parts of Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here