अहिल्यानगर: भाडेकरुच निघाला घरफोड्या; आरोपीला अटक
Breaking News | Ahilyanagar Crime: लोणी बुद्रुक येथे भाडेकरुच घरफोड्या निघाल्याने खळबळ उडाली.
लोणी: घरमालक बऱ्याचदा बाहेरगावी जायचे असल्यास भाडेकरूलाच लक्ष ठेवायला सांगतात. पण सगळेच भाडेकरू चांगले नसतात.राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे भाडेकरुच घरफोड्या निघाल्याने खळबळ उडाली आहे.
लोणी बुद्रुक येथील चित्रालाय सिनेमागृहालगत रमेश जगन्नाथ विखे यांचे घर आहे.त्यांच्या खोल्यामध्ये शिर्डी येथील अक्षय सुरेश गायकवाड हा भाडेकरू म्हणून रहातो. २ ऑक्टोबर रोजी विखे यांना बाहेरगावी कामानिमित्त जायचे असल्याने त्यांनी घराला कुलूप लावून सकाळीच निघून गेले.सायंकाळी घरी आले तेंव्हा त्यांना धक्काच बसला.घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून त्यांचे कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
रमेश विखे तातडीने लोणी पोलीस ठाण्यात पोहचले.कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी कैलास वाघ यांना घटना सांगितली आणि आरोपी शोधन्याची चक्रे वेगाने फिरली.अल्पावधीत आरोपी शोधून त्याने चोरून नेलेल्या ६० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांपैकी ५० हजारांची दागिने त्याच्याकडून हस्तगत केली. उर्वरित दागिन्यांचा शोध घेण्यासाठी आरोपीला न्यायालयात हजर करून दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळवली.
Breaking News: Tenant commits house burglary Accused arrested