Home अहमदनगर अहिल्यानगर: पोहण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा पाण्यात बुडून मृत्यू

अहिल्यानगर: पोहण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा पाण्यात बुडून मृत्यू

Breaking News | Ahilyanagar: ढोरानदी वरील बंधार्‍यात पोहण्यासाठी  गेलेल्या युवकाचे पाण्यात बुडून मृत्यू झाला.

teacher drowned while going for a swim

शेवगाव: सामनगाव (ता. शेवगाव) येथील ढोरानदी वरील बंधार्‍यात पोहण्यासाठी  गेलेल्या युवकाचे पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.  सामनगाव येथील रहिवाशी असलेले दिपक झाडे (वय 48) असे त्यांचे नाव असून ते महालक्ष्मी हिवरे (ता. नेवासा) येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते.

याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यांच्यावर सामनगाव (ता. शेवगाव) येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत माहिती अशी, दिपक झाडे हे गुरुवार (दि.24) रोजी सकाळी 7 च्या सुमारास सामनगाव येथील ढोरानदीवरील बंधार्‍यावर मित्रांसह पोहण्यासाठी गेले होते. बंधार्‍यानजिक पोहत असतांना ते पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. इतरांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने ते पाण्यात बुडाले.

परिसरातील युवकांनी त्यांना वर काढून शेवगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. त्यांच्यावर दुपारी सामनगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: teacher drowned while going for a swim

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here