संगमनेरात स्वाइन फ्लूचा धोका: संगमनेरात सर्वाधिक १० रुग्ण तर एकाचा मृत्यू
Sangamner Swine Flu: सर्वाधिक १० रुग्ण एकट्या संगमनेरमध्ये.
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ११ स्वाइन फ्लूचे रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी संगमनेर तालुक्यातील येठेवाडी खंदरमाळ येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाकडे जानेवारी ते १९ ऑगस्ट २०२२ या कालावधीतील रुग्णसंख्येचा अहवाल उपलब्ध आहे. त्यात ११ स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंद आहे. तथापि, हे सर्व रूग्ण महिनाभरातच आढळून आले आहेत. सर्वाधिक १० रूग्ण एकट्या संगमनेर तालुक्यातील आहेत. तर एक रूग्ण कोपरगाव तालुक्यातील आहे.
जिल्हा परिषदेच्या घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील येठेवाडी धांदरफळ येथील ५८ वर्षीय व्यक्तीला १३ जुलैला सर्दी, ताप व खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर स्थानिक पातळीवर तसेच नाशिक जिल्ह्यातील रूग्णालयात उपचार घेतले. तब्बल ८ दिवसांनंतर नाशिक येथे २२ जुलैला या रूग्णाला स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले. या रूग्णाचा १० ऑगस्टला उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत रूग्णाच्या परिवारातील सात जणांची तपासणी करण्यात आली, त्यात एकही बाधीत नाही.
Web Title: Swine flu threat in Sangamner