तुझी लायकीय का पाटलाशी सोयरीक करायची…’प्रेमप्रकरणातून धमकी, तरुणानं घेतला गळफास
Breaking News | Nanded Suicide: गावात बेइज्जत करतो, चिरून टाकतो अशी धमकी दिल्याने तरुणाने भीतीपोटी गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.
नांदेड: प्रेमप्रकरणातून आधी तरुणास बेदम मारहाण करत ‘तुझी लायकी आहे का पाटलाच्या देशमुखांशी सोयरीक करायची’ असा धमकीचा फोन मुलीच्या काकाकडून 19 वर्षीय तरुणाला गेला. गावात बेइज्जत करतो, चिरून टाकतो अशी धमकी दिल्याने तरुणाने भीतीपोटी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार नांदेड शहराजवळच्या सुगाव येथे गुरुवारी घडलाय. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात मुलीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन शिंदे अस मयत तरुणाच नाव आहे. नितीन शिंदे या तरुणाच थुगांव येथील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरु होतं. एक वर्षा पूर्वी मुलीच्या घरच्यांना त्यांच्या या प्रेम प्रकरणा बाबत माहिती झाली… मुलीच्या नातेवाईकाकडून तरूणाला धमक्या देण्यात आल्या .18 मार्च रोजी मुलीच्या नातेवाईकानी गावात नितीनला मारहाण करत घरा पर्यंत आणले . पुन्हा दुसऱ्या दिवशी मुलीच्या काकाने फोन करुन नितीनला धमकी दिली .तुमची लायकी आहे का पाटलाची देशमुखासंग सोयरपण करायची . गावात येईन बेइज्जत करतो . चिरून टाकतो अशी धमकी मुलीच्या काकाने फोन वरून दिली .तेव्हा भीतीपोटी नितीन शिंदे या तरुणाने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या धमक्या आणि मारहाणीच्या भीतीतून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने प्रेयसीला मेसेज केल्याचेही समोर आले.
मुलाच्या वडिलांच्या तक्रारी वरुन मुलीसह ज्ञानदेव भोसले, संतोष भोसले, विक्रम भोसले, अर्जुन भोसले, नितीन भोसले, संतोष भोसले यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेम प्रकरणाच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली .. तुझी लायकी आहे का पाटलाची देशमुखासंग सोयरपण करायची अशी धमकी तरूणाला देण्यात आली .याच भीतीपोटी एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नांदेड शहराजवळच्या सुगांव येथे गुरुवारी ही घटना घडली. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात मुलीसह सात जना विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Suicide Threatened over love affair, young man hangs himself