पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी तरुणाचा घरात गळफास
Breaking News | Ahmednagar: आरोपी तरुणाने पोलीस पथक आल्याची चाहूल लागताच स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
राहुरी: तालुका विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका आरोपी तरुणाने पोलीस पथक आल्याची चाहूल लागताच स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राहरी शहरात काल दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळच्या दरम्यान घडली.
गणेश बाळासाहेब शेटे, (वय २६ वर्षे, राहणार पाच नंबर नाका, खळवाडी) या तरुणावर पोलिसांत विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
गणेश शेटे हा तरुण पोलिस डायरीत पसार असताना पोलिसांचे एक पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने काल दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान गणेश शेटे याचा शोध घेण्यासाठी राहुरी शहरात आले होते. त्यावेळी गणेश शेटे हा तरूण पाच नंबर नाका, खळवाडी येथील त्याच्या घरी एकटाच होता. पोलीस पथक पकडण्यासाठी आल्याची चाहूल लागताच गणेश शेटे याने घराचा दरवाजा आतून बंद केला. आणि घरातील छताला असलेल्या फॅनला दोरी बांधून गळफास घेतला. सदर घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस उप निरीक्षक धर्मराज पाटील, सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे, हवालदार बाबासाहेब शेळके, आजिनाथ पाखरे, प्रमोद ढाकणे, सुरज गायकवाड, सचिन ताजणे आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन गणेश बाळासाहेब शेटे यास घरातून बाहेर काढले. यावेळी गणेश शेटे याच्या नातेवाईकांनी गणेशला मृत अवस्थेत पाहून हंबरडा फोडला. त्यानंतर गणेश शेटे याला रुग्णवाहिकेमधून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून उपचारा पूर्वीच मयत घोषित केले. गणेश शेटे याच्यावर रात्री उशीरापर्यंत शवविच्छेदन सुरु होते. यावेळी शहरातील शेकडो तरुणांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.
Web Title: Suicide police came, the accused youth hanged himself in the house
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News