धक्कादायक घटना: अनैतिक संबंधातून दोघांची आत्महत्या
Beed Suicide News: एका महिलेसह पुरुषाने एकाचवेळी आत्महत्या, अनैतिक संबंध असल्याचे समोर आले.
बीड: बीडच्या पिंपळनेर येथे एका महिलेसह पुरुषाने एकाचवेळी आत्महत्या केल्याने 26 जानेवारीला खळबळ उडाली होती. तर पोलिसांकडून याबाबत तपास सुरु असतानाच, त्या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. तर आर्थिक व्यवहारातून त्यांच्यात बिनसले होते, यामुळे दोघांनीही आपले जीवनयात्रा संपविल्याची माहिती समोर आली आहे.
मोहन बाबूराव नरवडे (वय 53 वर्षे), कौसाबाई भीमराव जाधव (वय 40 वर्षे, दोघे रा. पिंपळनेर) अशी मृतांची नावे आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मृत कौसाबाईचे सासर गेवराई तालुक्यात असून माहेर बाभळवाडी (ता. बीड) आहे. दरम्यान त्या पाच वर्षापासून पिंपळनेरमध्ये राहत होत्या. 26 जानेवारीला सकाळी मोहन नरवडे यांनी स्वतःच्या शेतात गोठ्यामध्ये लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर याच गोठ्याजवळील विहिरीतच कौसाबाई जाधव यांचा देखील मृतदेह (Dead body) पाण्यावर तरंगताना आढळला होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. तर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले होते.
या घटनेनंतर मयत कौसाबाईच्या भावाच्या फिर्यादीवरून 27 जानेवारीला मृत मोहन नरवडेवर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. तर कौसाबाईने मोहन नरवडेला 50 हजार रुपये उसने दिले होते. हे पैसे कोसाबाई परत मागत होती. मात्र, मोहन पैसे न देता उलट तिला त्रास देत होता, असे कौसाबाईच्या यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.
आत्महत्या (Suicide) केलेल्या कौसाबाई यांना दोन मुली व एक मुलगा आहे. तर मोहनला दोन मुले व एक मुलगी आहे. विवाहित असलेल्या या दोघांच्या प्रेमाचा शेवट वाईट झाला. कौसाबाईची मुले आईच्या तर मोहनची मुले वडिलांच्या प्रेमाला कायमची पारखी झाली आहे. त्यामुळे या दोघांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठं डोंगर कोसळले आहे.
Web Title: Suicide of two due to immoral relationship
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App