अहिल्यानगर: खून झालेल्या युवकाच्या प्रेयसीची आत्महत्या, खून प्रेम संबंधातून…
Breaking News | Ahilyanagar: खून करून त्याचा मृतदेह कुकडी कालव्यामध्ये फेकून देण्यात आल्याची घटना, युवतीच्या प्रेमप्रकरणामुळे हे सर्व प्रकरण घडले, तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या.
कर्जत: बीड येथील युवक रणजीत गिरी याच्या खून करून त्याचा मृतदेह कुकडी कालव्यामध्ये फेकून देण्यात आल्याची घटना 23 डिसेंबर रोजी घडली होती. दरम्यान, त्याच्या प्रेयसीने राहत्या घरात गळफास घेतला. कर्जत तालुक्यातील खांडवी येथे 25 डिसेंबरला दुपारी दोन वाजता ही घटना घडली. यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. बीड येथील रणजीत सुनील गिरी या युवकाचा नाजूक संबंधांमधून मारहाणीनंतर त्याला दोरीने गळफास देऊन खून करण्यात आला व पुरावा नष्ट करण्यासाठी कुकडी कालव्यामध्ये फेकून देण्यात आला होता.
मात्र नांदगाव गावाच्या शिवारामध्ये कालव्यामधून मृतदेह वाहून जात असताना नागरिकांनी पाहिला आणि याबाबत तात्काळ पोलिसांना कळवले. हा खून प्रेम संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी संतोष बाबुराव जाधव (रा.खांडवी, ता. कर्जत), ऋषिकेश रवी बोरकर (रा.वडझिरे, ता. पारनेर), उद्धव उर्फ संतोष मांडगे (रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा) आणि खांडवी येथील महिलेला अटक केली होती.
दरम्यान, याप्रकरणी ज्या युवतीच्या प्रेमप्रकरणामुळे हे सर्व प्रकरण घडले तिने बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ मिरजगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये युवतीचा मृतदेह मिरजगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
Web Title: Suicide of murdered youth’s girlfriend, murder from love affair
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News