संगमनेर: विवाहित तरुणीची आत्महत्या, एक वर्षापूर्वी झाला होता विवाह
Breaking News | Sangamner: घराच्या वरच्या मजल्यावरील बेडरुममधील खिडकीला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या (Suicide).
संगमनेर: एक वर्षापूर्वी विवाह झालेल्या तेवीस वर्षीय तरुणीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मिर्झापूर (ता. संगमनेर) येथे शुक्रवार दि. २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, सायली अविनाश वलवे हिचा एक वर्षापूर्वी मिर्झापूर येथील अविनाश वलवे याच्याशी विवाह झाला होता. तिने घराच्या वरच्या मजल्यावरील बेडरुममधील खिडकीला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. तिला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. याप्रकरणी सुभद्रा निवृत्ती वलवे यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी सीआरपीसी १७४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. जायभाये हे करत आहे. दरम्यान, या तरुणीने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही.
Web Title: Suicide of married girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study