संगमनेर तालुक्यात आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या | Suicide
Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारात असलेल्या तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलाव परिसरात एका व्यक्तीने आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. नामदेव सुखदेव साळवे वय ३५ रा. निळवंडे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली, या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडगावपान शिवारातील प्रादेशिक योजनेच्या साठवण तलाव परिसरात आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत नामदेव सुखदेव साळवे यांचा मृतदेह आढळून आला. भीमराज तुळशीराम गायकवाड यांच्या शेतातील विहिरीच्या बाजूला आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह लटकलेला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे व मयताचे सासरे अर्जुन गायकवाड ययांनी संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली.
पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह झाडावरून खाली घेत पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी हलविला. याप्रकरणी उत्तम रामचंद्र भालेराव ( रा. मालदाड ) यांनी खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विष्णू आहेर अधिक तपास करीत आहे. या व्यक्तीने आत्महत्या का केली ? याचे निश्चित कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.
Web Title: Suicide by hanging a mango tree with a rope in Sangamner taluka