Home अहमदनगर दूध उत्पादकांना अनुदान जाहीर : मंत्री विखे

दूध उत्पादकांना अनुदान जाहीर : मंत्री विखे

Ahmednagar News: सदर योजना (दि.१) जानेवारी ते २९ फेब्रुवारीपर्यंत लागू.

Subsidy announced to milk producers Vikhe Patil

शिर्डी : राज्यातील सर्व दूध उत्पादकांचे आर्थिक हित लक्षात घेवून सहकारी दूध उत्पादक संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरीता दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सर्व आमदार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेवून ५ रुपये अनुदानाचा निर्णय जाहीर केला. सदरची अनुदान योजना ही राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार आहे. याकरीता सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफ करीता प्रतिलिटर किमान २९ रुपये दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत प्रतिलिटर ५ रुपये अनुदान बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. सदर अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधारकार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक करणे व पडताळणी करणे आवश्यक असल्याचे सांगून सदर अनुदानाची योजना (दि.१) जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी लागू करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार आढावा घेवून या योजनेला मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, सदर योजना दुग्धविकास आयुक्तांच्या मार्फत राबविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. यापूर्वी सुद्धा राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती. त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध स्विकारुन त्याचे दूध भुकटी व बटरमध्ये रुपांतर करुन अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता.

Web Title: Subsidy announced to milk producers Vikhe Patil

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here