Home अकोले विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे- डॉ. विश्वासराव आरोटे

विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे- डॉ. विश्वासराव आरोटे

Breaking News | Akole: आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर अभ्यासाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.

Students should face the exam with confidence - Dr. Vishwasrao Arote

राजूर: विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाने जीवनातील इच्छित ध्येयपूर्ती गाठण्याचा प्रयत्न करावा. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर अभ्यासाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे आवाहन येथील मराठी राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले.  अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवारी  बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य भाऊसाहेब बनकर होते. प्रमुख पाहूणे मराठी राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे आणि कायझेन संस्थेचे संचालक महेश डाळिंबकर होते, उपस्थितांच्या हस्ते विद्याथ्यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये शिक्षकांचे अध्ययन व अध्यापन याचे अनुभव सांगितले य सर्व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली

जीवनामध्ये इयत्ता दहावी व बारावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी त्यासाठी कठोर अभ्यास करण्याची गरज आहे, भविष्यात पुढील शिक्षणामध्ये त्यांना नवनवीन संधी अनेक वाटा उपलब्ध होतील, आपल्या पालकांचे व आई-वडिलांचे तसेच शिक्षकांचे ऋण विद्यार्थ्यांनी कधीही विसरू नये. विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास यश हमखास मिळते, असे महेश डाळिंबकर सांगितले. विद्यार्थ्यांना कोणकोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत हे सांगतानाच आजच्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर आपले ज्ञान संपादन करण्यासाठी जर केला तर त्यांना यशाला सहज गवसणी घालता येऊ शकते. असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी ज्ञान ग्रहण करताना जे जे काही आपल्याला आत्मसात करता येईल त्या गोष्टींचा सातत्याने ध्यास घेऊन यश काबीज केले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्या यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, असे प्रतिपादन प्राचार्य भाऊसाहेब बनकर  यांनी केले.

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम, इंग्रजी ग्रामर आणि बरेच काही – एजुकेशन पोर्टल 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्राचार्य अण्णासाहेब धतुरे, अध्यक्षीय सुचना बी.एस. घिगे यांनी मांडली. अतिथींचा परिचर व स्वागत शरद तुपविहीरे यांनी केले.सुत्रसंचलन सचिन लगड तर आभार एस.बी. कोटकर यांनी मानले.

Web Title: Students should face the exam with confidence – Dr. Vishwasrao Arote

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here