Home उस्मानाबाद अहमदनगर: विद्यार्थिनीवर अत्याचार, हॉटेलमध्ये केले कृत्य, तिघे फरार 

अहमदनगर: विद्यार्थिनीवर अत्याचार, हॉटेलमध्ये केले कृत्य, तिघे फरार 

Breaking News | Ahmednagar: एका कॅफेमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीवर तरुणांनी अत्याचार केल्याची घटना.

Student assaulted, committed in hotel, three absconding

श्रीरामपूर : शहरातील एका कॅफेमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीवर तरुणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.  मुलीला शिर्डी येथे नेऊन एका हॉटेलवरही तरुणांनी अत्याचार केल्याचे समोर आले. ही घटना एप्रिल २०२४ मध्ये घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघा तरुणांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ललित, अनिकेत व महेश या तरुणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. यातील एक आरोपी हा शिरसगाव येथील असून दोघे माळेवाडी गावातील आहेत. शहरातील कॅफेमध्ये दोघा तरुणांनी विद्यार्थिनीवर अत्याचार केला. तर त्यानंतर तिला शिर्डी येथे नेण्यात आले. तेथेही तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. पीडित विद्यार्थिनीने शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. विद्यार्थिनीच्या अज्ञानपणाचा आरोपींनी गैरफायदा घेतला.

दरम्यान, घटनेतील तीनही आरोपी फरार झाले आहेत. शहर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी हे विद्यार्थिनीचे परिचित असल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: Student assaulted, committed in hotel, three absconding

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here