अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत विनयभंग
Breaking News | Ahilyanagar: एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग (Molested).
श्रीरामपूर : बेलापूर येथील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी अब्दुल नावाच्या आरोपीविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलापुरातील १४ वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी कुटुंबासह राहते. बेलापुरातील मधील हायस्कूलमध्ये ती शिक्षण घेते. शहरातून रस्त्याने जात असताना अब्दुल याने तिचा मोटारसायकलवरून पाठलाग केला. तिच्याकडे मोबाइल नंबरची मागणी केली. संध्याकाळी पुन्हा पाठलाग करत मुलीचा हात धरला. लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. आरोपी अब्दुल हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Web Title: Stalking and molesting a minor girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study