आई-वडील संगमनेरला रक्षाबंधनासाठी गेले अन तरुणीने उचलले धक्कादायक पाऊल
Ahmednagar News: महाविद्यालयीन युवतीची गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
श्रीरामपूर | Shrirampur : महाविद्यालयीन युवतीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील भोकर येथून समोर आली आहे. महाविद्यालयीन युवती मयुरी ऊर्फ गौरी रावसाहेब पवार (वय २३) हिने चिंचेच्या झाडाला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गौरी हिचे दोन भाऊ घरी होते. आई-वडील संगमनेरला रक्षाबंधनासाठी गेले होते. शुक्रवारी सकाळी ६ वाजता भाऊ चेतन उठल्यानंतर गौरी घरात नसल्याचे निदर्शनास आले. त्याने धाकटा भाऊ केतन यास उठवून गौरीचा शोध घेतला असता, ती घरापासून जवळच असलेल्या चिंचेच्या झाडाला ओढणीने लटकलेली अवस्थेत आढळून आली. लगतच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. पोलिस पाटील बाबासाहेब साळवे यांनी तालुका पोलिस ठाण्याला खबर दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
Web Title: Shrirampur College girl committed suicide by hanging herself
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App