मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी देत ९ महिने अत्याचार
श्रीगोंदा | Shrigonda: अंघोळ करीत असतानाचा व्हिडीओ बनवून जबरदस्तीने एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक संबंध ठेवल्यप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अंघोळ करीत असतानाचा विडीयो चित्रीकरण करण्यात आला आणि तो व्हिडियो सर्व ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर मागील ९ महिन्यांपासून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवल्याची घटना समोर आली आहे.
रामदास मोरे असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी विवाहित असून त्याला दोन मुली असल्याचे माहिती समजली जात आहे. या नराधम आरोपीने पिडीत मुलीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत नऊ महिने तिच्यावर बलात्कार करीत होता.
पिडीत मुलीने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आरोपी रामदास मोरे याच्याविरोधात फिर्याद दिली असून त्याच्यावर पोक्सो, बलात्कार, विनयभंग अशा कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Web Title: Shrigonda threatening to make a viral video of a girl