Home अहिल्यानगर नगरमध्ये गोळीबार; तिघे ताब्यात

नगरमध्ये गोळीबार; तिघे ताब्यात

Breaking News | Ahilyanagar Crime: वस्तीवर दोन गटात झालेल्या वादातून बंदुकीतून गोळीबार झाल्याची घटना समोर.

Shooting in the city Three arrested

अहिल्यानगर: सावेडी उपनगरातील तपोवन परिसराततील ढवण वस्तीवर दोन गटात झालेल्या वादातून बंदुकीतून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल सांगळे, मयूर फणसे, आकाश नसाने, कुमार मराठे, भीमराज आव्हाड असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत जखमी प्रमोद रामदास घोडके (वय.२४ रा. तपोवन, अहिल्यानगर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तपोवन परिसरात घडली. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याबाबत तिघांना ताब्यात घेतले आहे.

“लघुशंका करू नका” म्हणाल्याचा राग; जामखेडमध्ये तरुणावर गोळीबार

जामखेड: जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी (दि. १ जून) रात्री साधारण १० वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत असताना, फिर्यादीने “येथे लघवी करू नका, महिला आहेत” असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारावर गोळीबार केला. या हल्ल्यात साक्षीदाराच्या पायाला गोळी लागली असून, त्याला अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाला सुरुवात केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत.

नेमकं काय घडले?
जामखेड येथील पोकळे वस्तीतील रहिवासी आदित्य बबन पोकळे (वय २०, व्यवसाय: वॉशिंग सेंटर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री १० वाजता विंचरणा नदीजवळ त्याच्या घरासमोर काही महिला आणि नागरिक बसले होते. यावेळी एका चारचाकी वाहनातून उतरलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी तिथे लघुशंका करण्यास सुरुवात केली. आदित्यने त्यांना “येथे लघवी करू नका, महिला आहेत” असे सांगितले. याचा राग आल्याने त्या तिघांनी आदित्यला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तिथे आलेल्या कुणाल बंडू पवार (वय २०, रा. जामखेड) याच्यासह आदित्यवर आरोपींनी पिस्तूलातून गोळीबार केला. कुणालच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली, त्यामुळे त्याला प्रथम जामखेड येथील खाजगी रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले.

Breaking News: Shooting in the city Three arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here