Home पालघर शाळकरी मुलीला घरी सोडतो सांगत जंगलात नेले, तरुणीसोबत भयंकर कृत्य

शाळकरी मुलीला घरी सोडतो सांगत जंगलात नेले, तरुणीसोबत भयंकर कृत्य

Breaking News | Palghar Crime: शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर.

shocking incident of rape of a school girl

पालघर: पालघरमध्ये शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलीला घरी सोडतो असं सागून जंगलात नेले आणि त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेने पालघर हादरले आहे. याप्रकरणी आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी पोलिस कोठडीमध्ये करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला आहे. या तरुणीला घरी सोडतो या बहाण्याने तिला दुचाकीवर बसवले आणि जंगलात नेले. याठिकाणी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पीडित तरुणीला वडिलांसोबत घरी सोडतो असे आरोपीने सांगितले. वाडा येथून गावाच्या दिशेने जात असताना पीडित तरुणीच्या वडिलांना काही तरी काम आहे असे सांगून त्यांना मध्येच उरण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला जंगलामध्ये नेऊन दमदाटी करत तिच्यावर बलात्कार केला.

तरुणीने तक्रार दाखल केली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या घटनेने पालघर हादरले आहे.

Web Title: shocking incident of rape of a school girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here