राहुरी पोलीस ठाण्यात एक वरिष्ठ अधिकारी व चार पोलीस करोनाबाधित
राहुरी | Rahuri: राहुरी पोलीस ठाण्यात करोनाचा शिरकाव झाल्याने बाधित आढळून येत आहेत. राहुरी तालुका पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह चार जण करोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या या पोलीस ठाण्यातील १२ कर्मचारी करोनाबाधित असल्याने उपचार घेत आहे.
राहुरीच्या कारागृहातील ३७ कैदी करोनाबाधित आढळून आल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी यांची करोना तपासणी करणे गरजेचे आहे. अन्यथा एखाद्या कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता असल्याचे पोलिसांमध्ये बोलले जात आहे.
कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी आजारी पडत आहेत. चार दिवसांपूर्वी पोलीस कर्मचारी बाधित आढळून आले. मागील दोन दिवसांत एक वरिष्ठ अधिकारी व चार पोलीस कर्मचारी बाधित आढळून आले आहेत. कैद्यापाठोपाठ पोलिसांमध्ये बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Senior officer and four policemen were corona infected in Rahuri