Home अहमदनगर अहमदनगर: प्रवरा नदीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

अहमदनगर: प्रवरा नदीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: मित्रांसोबत प्रवरा नदीपात्रात पोहायला गेलेल्या एका शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना.

School boy dies after drowning in Pravara river

कोल्हार: मित्रांसोबत प्रवरा नदीपात्रात पोहायला गेलेल्या एका शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून अंत झाला. त्याच्यासोबतचे दोन मित्र सुखरूप आहेत. कोल्हार बुद्रुक येथील बागमळा शिवारात ही घटना घडली. तब्बल तीन तासांच्या अथक शोधकार्यानंतर मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले. बेकायदेशीर वाळू उपसून नदीपात्रात झालेल्या खड्ड्यामुळे हा बळी गेल्याची चर्चा स्थानिक रहिवाश्यांमध्ये होती.

अविनाश पाराजी जोगदंड (वय १५), रा. निर्मलनगर, भगवतीपूर असे मयताचे नाव आहे. मध्यंतरी प्रवरा नदीपात्रात पाणी सोडल्याने सध्या नदीत अडलेले पाणी आहे. सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्टया सुरू आहेत. बुधवार दि. २९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अविनाश जोगदंड, विश्वजीत बर्डे (रा. भगवतीपूर) आणि शुभम चौरसिया (रा. बागमळा) हे तिघे मित्र घरात कुणालाही काहीच न सांगता कोल्हार बटुक येथील बागमळा शिवारातील प्रवरा नदीपात्राकडे गेले. अविनाश जोगदंड पाण्यात पोहण्यासाठी नदीत उतरला, अनधिकृत बाळू उपशामुळे नदीपात्रात मोठमोठ्या आकाराचे खड्डे झालेले आहेत. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अविनाश जोगदंड यात बुडाला. गटांगळ्या खाणाऱ्या अविनाशला पाहून त्याचे दोन मित्र घाबरले. मित्राला वाचविण्यासाठी त्यांनी लगबगीने जाऊन आजूबाजूच्या लोकांना बोलावून आणले. स्थानिक रहिवाशी धावत घटनास्थळी आले. मात्र तोपर्यंत अविनाश पूर्णपणे पाण्यात बुडाला होता.

दुपारी १२ वाजेच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ही खबर पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आली. लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, कोल्हारचे कामगार तलाठी निलेश बाघ हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

चांगले पोहता येणाऱ्या गावातल्या स्थानिक तरुणांनी नदीपात्रात उतरून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. दुपारी दोन वाजता राहाता, शिर्डी, श्रीरामपूर येथून आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गळ टाकून नदीपात्रात मृतदेह शोधकार्य सुरू केले. दुपारी ४ वाजता मृतदेह मिळून आला. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह नदीपात्राच्या बाहेर काढण्यात यश आले.

Web Title: School boy dies after drowning in Pravara river

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here