संगमनेर तालुका १४८२ उमेदवार रिंगणात तर चार ग्रामपंचायती बिनविरोध
संगमनेर तालुका १४८२ उमेदवार रिंगणात तर चार ग्रामपंचायती बिनविरोध | Sangamner Taluka Grampanchayat Election
Sangamner: संगमनेर तालुक्यात ९४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत.
तालुक्यातील ८८८ जागांसाठी २ हजार ६७९ उमेदवारांनी केले अर्ज दाखल
छाननी केल्यानंतर २ हजार ६०६ अर्ज शिल्लक
सोमवारी तब्बल ९३२ उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यात आले.
तालुक्यात आता फक्त १ हजार ४८२ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
एकूण ९४ ग्रामपंचायतीत ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
तालुक्यात निवडणुकीची खरी रंगत बुधवारपासून पाहायला मिळणार आहे.
आश्वी तसेच पठार भागातील ग्रामपंचायतमध्ये कॉंग्रेस व भाजप यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.
आश्वी भागातून महसूलमंत्री थोरात व विखे यांच्या गटात चुरस अनुभवायाला मिळणार आहे. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.
१५ जानेवारो रोजी ग्रामपंचायत निवडणूक मतदान होणार आहे.
Web Title: Sangamner Taluka Grampanchayat Election