संगमनेर: पेट्रोल पंपावरील अपहारप्रकरणी तिघांना अटक
संगमनेर | Crime News: संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील ईश्वर पंपाच्या आर्थिक व्यवहारात अफरातफर केल्याचा गुन्हा आश्वी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता, बनावट कागदपत्रे बनवून अफरातफर केल्याच्या कारणावरून आश्वी पोलिसांनी तीन जणांना शनिवारी अटक करण्यात आली आहे.
आश्वी येथील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर नोकरीस असलेल्या बिलाल बाबूभाई शेख, सचिन उत्तमराव कुलथे व जनार्दन देवराम दातीर यांना अटक अटक करण्यात आली आहे.
ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला अॅप येथून अपडेट करा. संगमनेर अकोले न्यूज
आरोपींनी पेट्रोल विक्रीच्या व्यवहारातील रोकड रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरत या रकमेचा अपहार केल्याने याबाबत आनंद अमृत गांधी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपींनी पेट्रोल पंपावर काम करताना खोटे व बनावट कागदपत्रे तयार केली. खोटा हिशोब लिहित मालकाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. पोलिसांनी तपासाअंती वरील तिघांना अटक केली असून अनिल नारायण बर्डे व रशीद फकीर मोहंमद सय्यद हे दोघे जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी वाघमारे हे तपास करीत आहे.
Web Title: Sangamner Crime News Three arrested in petrol pump embezzlement case