शिधापत्रिका (राशन) धारकांना ३५ रु. किलो तूरडाळ
शिधापत्रिका (राशन) धारकांना ३५ रु. किलो तूरडाळ
मुंबई: शिधापत्रिकाधारकांना आता तूरडाळ प्रतिकिलो ३५ रुपये या दराने मिळणार आहे. आधारभूत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०१६-१७ मध्ये राज्यातील शेतकर्यांकडून हमीभावाने खरेदी केलेल्या तुरीची भरपाई करून प्राप्त झालेल्या तूरडाळीची स्वस्त दराने रास्त भाव दुकानातून विक्री करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे. या शासन निर्णयानुसार अधिकृत शिधावाटप दुकानातून ५५ रुपये प्रती किलो या दराने उपलब्ध करून देण्यात आली होती.
You Might Also Like: Rajinikanth and Akshay Kumar’s 2.0
तूरडाळीचे सध्याचे दर लक्षात घेऊन विक्री दरामध्ये आता ३५ रुपये प्रती किलो अशी सुधारणा करण्यात आली आहे. सर्व अधिकृत शिधावाटप दुकानातून तूरडाळ सर्वप्रकारच्या शिधापत्रिका धारकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
