Home अहिल्यानगर अहिल्यानगर: ट्रॉलीला रिक्षा धडकली; एक जण ठार

अहिल्यानगर: ट्रॉलीला रिक्षा धडकली; एक जण ठार

Breaking News | Ahilyanagar Accident:  उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिक्षाने पाठीमागून धडक दिल्याने एक ठार.

Rickshaw hits trolley one killed

कोपरगाव:  नगर-मनमाड रस्त्यावरील येसगाव हद्दीत उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिक्षाने पाठीमागून धडक दिल्याने एक ठार तर सात जण जखमी झाले. ही घटना शुक्रवार 18 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या अपघातात जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर-मनमाड रस्त्यावरील येसगाव शिवारात हॉटेल संस्कृतीसमोर शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एक नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती. त्याचवेळी एमएच 17 बीझेड 0370 अपघातात वाल्मीक नाना घनघाव (वय 60, रा. पिंपळस, ता. निफाड) हे जागीच ठार झाले. तर सलिम रजाक सय्यद (रा. येसगाव), गौरी पाईक (रा. येसगाव), रेखा लोखंडे (खिर्डी गणेश) हे गंभीर जखमी झाले. सगुणाबाई पवार (येसगाव), सायली त्रिभुवन (रा. येसगाव), चालक अतुल बैरागी (येसगाव), निशा पाईक (रा. येसगाव) यांनाही जखम झाल्या आहेत. गंभीर जखमींवर नाशिक व लोणी येथे तर उर्वरित जखमींवर कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मयत वाल्मीक घनघाव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक वलवे करीत आहेत.

Breaking News: Rickshaw hits trolley one killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here