Home महाराष्ट्र पावसाचा इशारा, नगरसह राज्यात विविध  भागात अलर्ट जारी- Rain Alert

पावसाचा इशारा, नगरसह राज्यात विविध  भागात अलर्ट जारी- Rain Alert

Rain Alert alerts issued in various parts of the state including the city

Rain  Alert | मुंबई: राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येथील नागरिकांना सतर्क राहण्याचे इशारा देण्यात आला आहे. कोकणात ऑरेंज असणार आहे. तर ठाणे, पालघर, मुंबई, रायगड या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

तर मध्य महाराष्ट्रात नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर येथे विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर येथेही चांगला पाऊस (Rain) होण्याचा अंदाज आहे.

मराठवाडामधील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली येथे पाऊस होईल. तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Rain Alert alerts issued in various parts of the state including the city

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here