Home अहमदनगर उपवासाला भगरीच्या पीठाचे पदार्थ खाल्याने १७ जणांना विषबाधा

उपवासाला भगरीच्या पीठाचे पदार्थ खाल्याने १७ जणांना विषबाधा

Rahuri Poisoning of 17 people by eating Bhagari flour

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे शनिवारी रात्री उपवासाला भगरीच्या पीठाचे पदार्थ खाल्याने १७ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सुधारली आहे.

नवरात्रीच्या दिवसांत उपवासामध्ये भगरीचा वापर केला जातो. म्हैसगाव परिसरात शनिवारी  उपवासाचा पहिला दिवस असल्याने भगरीचे पीठाचे पदार्थ करण्यात आले. हे पदार्थ खाल्यानंतर अनेक महिला व पुरुष यांना जुलाब, उलटी चक्कर, मळमळ होणे अशी लक्षणे होऊ लागले. त्यांनी खासगी डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतले. रात्री उशिरा रुग्ण वाढू लागल्याने सर्व रुग्णांना सारखी लक्षणे दिसून आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना काय खाल्ले अशी चौकशी करण्यात आले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

या खासगी डॉक्टरकडे १५ महिला व २ पुरुषांनी उपचार घेतले. शनिवारी रात्री काही महिलांना त्रास होऊ लागला. सर्वाना सारखीच लक्षणे होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. खाद्यपदार्थातून हा प्रकार घडला असे डॉ. एम.डी. कवडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Rahuri Poisoning of 17 people by eating Bhagari flour

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here