दुर्दैवी घटना: मळणी यंत्रात अडकून विवाहित महिलेचा मृत्यू
राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे रविवारी दुपारी दुर्दैवी घटना घडली आहे. मळणी यंत्रात अडकून विवाहित महिलेचा अंत झाला आहे. विजया वैभव काकडे वय २४ असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.
विजया काकडे ही शेतातील बाजरीचे दाणे मळणी यंत्राद्वारे काढत असताना चाळणीवर साचलेले कांड्या काढण्यासाठी गेली असता तिच्या डोक्याला बांधलेले फडके अडकलेले मळणी यंत्राच्या शाफ्ट मध्ये अडकले. शाफ्टला गती असल्याने फडके गुंडाळून त्यामध्ये अडकली गेली. वेगवान गतीने ती महिला जमिनीवर जोरदार आदळली गेली. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हाता पायाला मार लागला. तिला ताबोडतोब लोणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर रात्री उपचार सुरु होते. मात्र तिचा रक्तस्त्राव अधिक झाल्याने तिने उपचाराला साथ दिली नाही. अखेर रात्री तिचा मृत्यू झाला. या घटनेने गावातून हळहळ व्यक्त होत आहे. तिला एक तीन वर्षाची व एक अकरा महिन्याची मुली आहेत.
See: Latest Entertainment News and Latest Marathi News
Web Title: Rahuri Married woman dies after getting stuck