शेतात घास कापत असलेल्या तरुण विवाहितेचा विनयभंग
राहुरी | Rahuri: देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असून जिल्ह्यात देखील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.
राहुरी राळूक्यातील घोरपडवाडी येथे २१ वर्षाची विवाहित तरुणी आपल्या शेतात घास कापत असताना आरोपी पाठीमागून येऊन तिला धरले, तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिचा विनयभंग केला.
आरोपीनी शेतात घुसून त्याच्या विरोधात असलेला दिवाणी दावा कोर्टात दाखल केलेला तो काढून घे नाहीतर तुला कुऱ्हाडीने ठार मारू अशी धमकी दिली. मंगळवारी १० वाजता घोरपडवाडी शिवारात विनयभंग व धमकीचा प्रकार घडला. याप्रकरणी पिडीत तरुणीने फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून आरोपी सर्जेराव कुशीनाथ जाधव, नानासाहेब कुशिनाथ जाधव, नितीन सर्जेराव जाधव, उत्तम नाना जाधव सर्व रा. घोरपडवाडी ता. राहुरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास जायभाय हे करीत आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Rahuri Harassment of a young married woman cutting grass