जिल्ह्यातील या तालुक्यात तब्बल २५ एकर ऊस जळून खाक
Ahmednagar | राहुरी | Rahuri News: राहुरी तालुक्यातील माहेगाव- मानोरी येथील गणपतवाडी शिवारात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे पंचवीस ते तीस एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सायंकाळी ही आग आटोक्यात आली आहे मात्र तोपर्यंत परीसरातील ऊसाचे सर्वच क्षेत्र जळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गणपतवाडी येथील राजेंद्र पटारे या शेतकऱ्यांच्या उसाच्या क्षेत्रामध्ये विजेच्या तारांना तारा घासून खाली आगीचे लोळ पडल्याने हि आग लागली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या आगीमुळे या क्षेञाजवळील कारभारी पटारे, बाळासाहेब वेताळ, रामभाऊ देठे,चंद्रभान देठे, बाळासाहेब लांडगे, बबन गिते, बाबासाहेब पटारे आदि शेतकऱ्यांच्या ऊसाला देखील ही आग लागली.
आगीचा प्रवाह इतका मोठा होता की परिसरातील वरील शेतकऱ्यांचे सुमारे पंचवीस ते तीस एकर उसाचे क्षेत्र हे पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सदर घटनेची माहिती समजताच परीसरातील चारशे ते पाचशे नागरिकांनी आज विझविण्यासाठी गर्दी केली होती. आगीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने ही आग आटोक्यात आली नाही.
Web Title: Rahuri Burn 25 acres of sugarcane in the taluka