बनावट सोने तारण कर्जप्रकरणी बँकेची फसवणूक, २१ जणांवर गुन्हा
राहुरी: राहुरी तालुक्यातील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव शाखेतील बनावट सोने तारण कर्जप्रकरणी बँकेची फसवणूक केल्याने २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ३४ लाख ४५ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. रविवारी दुपारी १० आरोपींना अटक करण्यात आली असून सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सोनगाव शाखाधिकारी प्रविणकुमार पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारण केलेल्या १९१ पैकी १३४ कर्जदरांचे सुमारे अडीच कोटी रुपयांचे कर्ज वसुलीचे सोन्याचे दागिने सत्यता पडताळणीत बनावट आढळून आले आहेत.
गोल्ड किमत ठरविणार(Gold Valuer) अरविंद विनायक नागरे रा, टाकळीमिया यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर १० आरोपी अजूनही फरार आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे हे करीत आहेत.
Web Title: Rahuri Bank fraud in fake gold mortgage loan case