राधाकृष्ण विखेंनी पंतप्रधान मोदींच्या स्वागताला विक्रमी गर्दी जमविण्याचा चंग
Ahmednagar News: किमान एक ते दीड लाख नागरिकांची उपस्थितांचे टार्गेट.
अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नगर दौरा निश्चित झाला आहे. पंतप्रधान शिर्डी येथे 26 ऑक्टोबरला येत आहेत. या दौऱ्यातून महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू केली आहे.
मोदींच्या स्वागताला उच्चांकी गर्दी जमवायची आहे, त्यासाठी कामाला लागा, अशा सूचना मंत्री विखे यांनी भाजप आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 26 ऑक्टोबरचा शिर्डी दौरा निश्चित झाला आहे. मंत्री विखे यांनी जिल्हा प्रशासनाबरोबर बैठक घेतली, तर दुसरीकडे पक्षपातळीवर भाजप खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वतंत्र मेळावे घेत, नियोजनाचा आढावा घेतला. किमान एक ते दीड लाख नागरिकांची उपस्थित राहील, असे नियोजन करा, अशा सूचना मंत्री विखे यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या वेळी दिल्या.
गर्दी जमवण्यासाठी गावनिहाय वाहनांची व्यवस्था भाजपकडून केली जाणार आहे. याची जबाबदारी प्रमुख पदाधिकाऱ्यांवर असणार आहे. विविध योजनांचे सुमारे 40 हजार लाभार्थ्यांना वाहनांतून शिर्डीत आणले जाणार आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्थादेखील केली जाणार आहे. पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या नियोजनाची कमान मंत्री विखे यांच्याच हातात असणार आहे.
Web Title: Radhakrishna Vikhe gathers a record crowd to welcome Prime Minister Modi
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App