संतापजनक! गरोदर महिलेला ओढून जंगलात नेत दोघांचा जबरदस्ती अत्याचार
Breaking News | Buldhana Crime: सुमारास घरात घुसून परिवाराला बेदम मारहाण केली. यानंतर गरोदर महिलेला ओढून जंगलात नेत दोघांनी जबरदस्ती अत्याचार केल्याची संतापजनक घटना. (Raped)
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात हादरवणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास घरात घुसून परिवाराला बेदम मारहाण केली. यानंतर गरोदर महिलेला ओढून जंगलात नेत दोघांनी जबरदस्ती अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सदर महिलेच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात दररोज महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यात आता बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातून एक अत्यंत संतापंजनक घटना समोर आली आहे. यात एका २१ वर्षीय गर्भवती विवाहितेचे घरात घुसून अपहरण केले. यानंतर तिला जंगलात घेऊन जात तिच्यावर दोघा नराधमांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली. सदर घटना १० जुलैच्या रात्री घडली आहे.
दरम्यान पीडित महिला पती, सासू आणि मुलासह शेतात राहते. १० जुलैला रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मोहन बारेला आणि त्याचा एक साथीदार असे दोघे पीडित विवाहितेच्या घरात घुसले. त्यांनी लोखंडी विळा, विटांचा वापर करून पीडितेच्या सासूला आणि पतीला बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून पीडित गर्भवती महिलेचे किडनॅपिंग करत घरातून ओढत नेले.
सदर पीडित महिलेला बहापुरा शिवारात नेऊन तिथे दोघा नराधमांनी विवाहितेवर जबरदस्ती बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित विवाहितेने रात्रीच्या अंधारात रस्ता शोधत कसेबसे घर गाठले. यानंतर कुटुंबियांना घेऊन या घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.
Breaking News: Pregnant woman dragged into forest and raped by two men