पोलीस निरीक्षकाची शासकीय निवासात गळफास घेऊन आत्महत्या, पोलीस दलात खळबळ
Suicide Case: धुळ्यात पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या झाल्याची खळबळजनक घटना.
धुळे: धुळ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे, धुळ्यात पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धुळे प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात ही घटना घडली आहे. या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धुळ्यात पोलीस निरीक्षकाने प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात आत्महत्या केली आहे. प्रवीण कदम असे आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव आहे. प्रवीण कदम यांनी आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस निरीक्षक प्रवीण कदम हे गेल्या तीन वर्षांपासून धुळे येथे नियुक्त होते. या घटनेने धुळ्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक कदम यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: Police inspector committed suicide by hanging himself
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App