Home नाशिक पोलिसांचं वेशांतर,  वडिलांचं वेड्याचं सोंग, आणि मुलीची थरारक सुटका

पोलिसांचं वेशांतर,  वडिलांचं वेड्याचं सोंग, आणि मुलीची थरारक सुटका

Breaking News | Nashik Crime: पट्टयावर रिक्षा चालविणाऱ्या तरुणाने अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांनीही शहरातून पलायन केले.

police disguise, the father's madman disguise girl rescue

नाशिक: कॉलेज रोड पट्टयावर रिक्षा चालविणाऱ्या तरुणाने अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांनीही शहरातून पलायन केले. जवळचे पैसे संपल्यानंतर मात्र त्याने त्याचे रंग दाखविणे सुरू केले. अल्पवयीन मुलीचा छळ करून त्याने तिच्या वडिलांकडे पैशांची मागणी केली. प्रकरण सरकारवाडा पोलिसांत पोचल्यानंतर पोलिसांनीही संशयित युवकाला रिसोड (जि. वाशीम) येथून शिताफीने अटक करत मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तर वेशांतर केलेच शिवाय मुलीचा शोध घेण्यासाठी बापानेही वेड्याचे सोंग घेत रिसोड शहरातील गल्लीबोळा पायाखाली तुटवल्या. गणेश देवीदास हणवते (२१, रा. सध्या रा. मिशन मळा, शरणपूर गावठाण, नाशिक, मूळ रा. उमरावाबळे, हिंगोली) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.

एप्रिलमध्ये सरकारवाडा पोलिसांत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. संशयित गणेश सीबीएस ते कॉलेज रोड या मार्गावर रिक्षा चालवत होता. यादरम्यानच कॅनडा कॉर्नर परिसरातील अल्पवयीन पीडितेशी नियमित रिक्षाप्रवासातून ओळख झाली. त्यातून त्यांच्यात प्रेम फुलले. गणेशने तिचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांनी एप्रिलमध्येच लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेले. तर तक्रार दाखल असल्याने पोलिस संशयिताच्या मागावर होते.

संशयित गणेशने मुलीला घेऊन ठाण्यातील मित्राकडे गेला. त्याच्याकडे लपून-छपून राहिला. जवळचे पैसे संपल्याने तो ठेकेदाराकडे कामाला जाऊ लागला. परंतु, तेथूनही त्याने ठेकेदाराचे पाच हजार घेतले आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड गाठले. पैशांसाठी त्याने मित्रामार्फत मुलीच्या वडिलांना धमकावणे सुरू करीत दहा हजारांची मागणी केली. त्यासाठी त्याने पीडितेच्या रडण्याचे व्हिडिओ काढून ते तिच्या वडिलांना पाठविले.

संशयित गणेश याने मित्रामार्फत मुलीच्या वडिलांशी संपर्क साधताना स्वतःचा मोबाईल वापरला नाही. दुसऱ्या क्रमांकावरून तो संपर्क साधत असल्याने पोलिसांना त्याचा तांत्रिक विश्लेषणानुसार शोध घेणे अडचणीचे जात होते. तरीही पोलिसांनी सतत त्याच्या कॉलिंगवर संपर्क ठेवत अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या.

Breaking News: police disguise, the father’s madman disguise girl rescue

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here