Home संगमनेर संगमनेर: हातउसने दिलेले पैसे मागितल्याने एकाला मारहाण

संगमनेर: हातउसने दिलेले पैसे मागितल्याने एकाला मारहाण

Breaking News | Sangamner Crime: पैसे देण्याऐवजी शिवीगाळ करत झटापट करून धारदार वस्तूने गळ्यावर मारून जखमी केल्याचा प्रकार, एकावर गुन्हा.

One was beaten up for demanding money given by Hatus

संगमनेर: दोन वर्षांपूर्वी हातउसने दिलेले पैसे परत घेण्यासाठी बोलावले. त्यानंतर पैसे देण्याऐवजी शिवीगाळ करत झटापट करून धारदार वस्तूने गळ्यावर मारून जखमी केल्याचा प्रकार संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ रविवारी (दि. २१ जुलै) रात्री ८ वाजता घडला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की सागर रमेश चव्हाण (रा. लक्ष्मीचिराग नगर, ठाणे) याने दोन वर्षांपूर्वी गणेश मोहिते (रा. तांभोळ, ता. अकोले) यास हातउसने पैसे दिलेले होते. सध्या आर्थिक परिस्थिती खालावल्याने सागरने गणेशला पैसे देण्यासाठी बोलावले होते. माझी परिस्थिती अत्यंत खालावली असून तू माझ्याकडून घेतलेले हातउसने पैसे मला परत दे असे सांगत असतानाच गणेशने शिवीगाळ करत झटापट केली आणि धारदार वस्तूने सागरच्या गळ्यावर मारुन जखमी केले. त्यानंतर तुझे पैसे देणार नाही असे म्हणून निघून गेला. याप्रकरणी सागर चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीवरून गणेश मोहिते याच्यावर शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोहेकॉ. डुंबरे करत आहे.

Web Title: One was beaten up for demanding money given by Hatus

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here