Suicide: एकतर्फी प्रेमातून बस स्थानकात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
नंदुरबार: धडगाव पोलीस स्टेशन क्षेत्रांतर्गत बाजारपेठेतील बस स्थानक प्रवासी शेडमध्ये तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आहे. तरुणाचे रात्री उशिरा नाव व गाव निष्पन्न झाले. सदर मयत तरुणाचे नाव अर्जुन विरजी पाडवी अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा काठावरील डनेल सुजवापाडा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली.
आत्महत्या करण्यापूर्वी सदर तरूणाने फरशीवर खडूने प्रेम प्रकरणातून आत्महत्या करीत असल्याच्या आशयाची नोट लिहिली होती. मात्र, त्याच्या परिवाराने दिलेली माहिती चक्क करणारी आहे. अर्जुन विवाहित असून त्याची पत्नी आणि तीन मुले असल्याची माहिती अर्जुनच्या परिवाराने दिली आहे. अर्जुनने लिहिलेल्या नोटमध्ये वैशाली नामक मुलीचा उल्लेख केला होता. मात्र, अर्जुनच्या परिवाराला या मुली बद्दल काहीही माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. नातेवाईकांना अर्जुनचा मृतदेह ताब्यात देण्यात आला आहे. गळफास घेतलेल्या ठिकाणी वैशाली नावाच्या मुलीला उद्देशून प्रेम संबंधी मजकूर अर्जुनने एकतर्फी प्रेमातून लिहून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत धडगाव पोलीस स्टेशनात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास धडगाव पोलीस करीत आहे.
Web Title: one-sided love, a young man commits suicide by hanging himself at the bus stand