Home अहमदनगर अहमदनगर: मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने एक ठार; दोघे जखमी

अहमदनगर: मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने एक ठार; दोघे जखमी

Breaking News | Ahmednagar: सीएनजी पाइप तसेच मोबाइल कंपनीच्या केबलसाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी मातीचा ढिगारा तिघा मजुरांच्या अंगावर कोसळला. या घटनेत एकाचा मृत्यू तर दोघे जखमी.

One killed by mudslide Both injured

राहुरी:  नगर- मनमाड रस्त्यालगत सीएनजी पाइप तसेच मोबाइल कंपनीच्या केबलसाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी मातीचा ढिगारा तिघा मजुरांच्या अंगावर कोसळला. या घटनेत एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी घडली.

गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड रस्त्यालगत खोदकाम सुरू आहे. राहुरी हद्दीत धनलक्ष्मी शोरूमसमोर खोदकाम सुरू होते. दि. ४ ऑगस्ट रोजी १ वाजता सीएनजी पाइपलाइन जोडणीसाठी असलेल्या खड्ड्यात मोबाइल वायरिंग जोडणीचे काम सुरु होते. याच दरम्यान मातीचा ढिगारा तिघांच्या अंगावर कोसळला. यामध्ये गळनिंब (ता. श्रीरामपूर) येथील प्रदीप इंद्रभान भोसले (वय २७) हा जागीच ठार याला तर आकाश सरत देवरे (रा. खडका फाटा) व दत्तात्रय जालिंदर चितळकर (रा. चिंचाळे) हे दोघे जखमी झाले.

सीएनजी पाइपलाइनसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. ठेकेदाराचा निष्काळजीपणा प्रवाशांसाठी तापदायक असताना मजुरांसाठी जीवघेणा ठरला आहे. पावसाच्या रिमझिम सरी कोसळत असतानाही काम सुरूच असल्याने मातीचे ढिगारे कोसळत आहेत. त्यामुळे ठेकेदाराच्या दुर्लक्षितपणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

Web Title: One killed by mudslide Both injured

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here