Home अहमदनगर अहमदनगर: पकडला दीडशे किलो गांजा चौघांसह दोन कार ताब्यात : एनसीबीच्या पथकाची...

अहमदनगर: पकडला दीडशे किलो गांजा चौघांसह दोन कार ताब्यात : एनसीबीच्या पथकाची  कारवाई

Breaking News | Ahmednagar: मुंबईतील एनसीबीच्या (अंमली पदार्थ विरोध विभाग) पथकाने दोन कार पकडून दीडशे किलो गांजा पकडला.

One and a half hundred kilos of ganja were caught and two cars 

पाथर्डी:  करंजी नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी (ता. पाथर्डी) बायपास येथे मुंबईतील एनसीबीच्या (अंमली पदार्थ विरोध विभाग) पथकाने दोन कार पकडून दीडशे किलो गांजा पकडला. यावेळी दोन कारसह चौघेजण ताब्यात घेण्यात आले. रविवारी (दि.२३) सकाळी आठ वाजताच एनसीबीने ही कारवाई अत्यंत गुप्तता राखून केली. विशेष म्हणजे स्थानिक पोलिस प्रशासनाला मागमूसही लागू न देता ही कारवाई करण्यात आली.

अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या दोन्ही कार एकापाठोपाठ चालल्या होत्या. त्यातील एक कार करंजी बायपासवर अचानक बंद पडली. पहिली कार बंद का पडली म्हणून दुसरी कारही थांबली. बंद पडलेल्या कारचा चालक खाली उतरला, त्या परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी, कर्मचारी अगोदरच होते. त्यामुळे त्यांनी त्या चौघांना तेथेच पकडले.

 त्या दोन्ही कारमध्ये काही वेगवेगळ्या राज्यातील वाहनांच्या नंबर प्लेट आढळून आल्याचेही समजले. तसेच एनसीबीच्या पथकातील अधिकारी दोन दिवसांपासून त्या चौघांवर पाळत ठेवून असल्याची माहिती समोर आली.

रविवारी सकाळी आठच्या सुमारास नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी जवळील बायपासवर एक कार बंद पडली. चालक उतरून कारची पाहणी एनसीबीच्या पथकाने दोन्ही कारची तपासणी केली.

करीत असतानाच मुंबईतील एनसीबीच्या पथकाने त्या कारसह दुसऱ्या कारमधील काही व्यक्ती अशा चौघांना ताब्यात घेतले. त्या चौघांसह दोन्ही कार जवळच असणाऱ्या एका शेडमध्ये नेल्या. तेथे कारची तपासणी सुरू केली. एका कारच्या डिकीत तसेच सीट खाली अंदाजे १५० किलो गांजा, इतर काही अंमली पदार्थ आढळून आल्याची माहिती एनसीबीच्या पथकातील एका अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी पकडलेले चौघेही पुण्याकडील असल्याचे समजते. ते पुण्याकडे हे अंमली  ही कारवाई झाल्याचे समजताच करंजी येथील अनेक ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

सुरुवातीस स्थानिक पोलिसांना या कारवाईबाबत काहीच माहिती नव्हती. कारवाई पूर्ण होईपर्यंत या पथकातील अधिकाऱ्यांनीही कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे स्थानिक पोलिसांनाही हे नेमके काय चालू आहे हे समजत नव्हते. रात्री उशिरापर्यंत एनसीबीचे पथक करंजीतच कारवाईची प्रक्रिया पूर्ण करत होते.

Web Title: One and a half hundred kilos of ganja were caught and two cars 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here