संशयावरून पत्नीस पेट्रोल टाकून पेटविले, महिलेचा मृत्यू
संशयावरून महिलेला तिच्या पतीनेच पेट्रोल टाकून पेटवून (Fire) दिले. यात या महिलेचा मृत्यू (Death) झाल्याची घटना.
जळगाव : संशयावरून महिलेला तिच्या पतीनेच पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात या महिलेचा मृत्यू झाला असून पतीही जखमी झाला आहे. ही थरारक घटना हिंगोणे बुद्रुक येथे रविवारी मध्यरात्री घडली.
मीराबाई संतोष भिल (५५) असे या मृत महिलेचे नाव आहे. पती- पत्नीचे पटत नसल्याने हिंगोणे बुद्रुक येथील संतोष आखाडे भिल (६३) हा रिंगणगाव (ता. एरंडोल) येथे राहतो, तर पत्नी मीराबाई ही हिंगोणे बुद्रुक येथे राहत होती. रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास संतोष हा हिंगोणे येथे आला व त्याने मीराबाईच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. भाजलेल्या मीराबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
Web Title: On suspicion, his wife was set on fire by petrol, the woman died
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App