डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी, ती त्यांची खरी संस्कृती: सत्यजीत तांबे
Breaking News | Sangamner vidhansabha Election: विखे-थोरात गटातील संघर्षाचा अखेर भडका.
संगमनेर: विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विखे-थोरात गटातील संघर्षाचा अखेर भडका उडाला. शुक्रवारी सायंकाळी धांदरफळ बु येथे भाजपची युवा संकल्प सभा होती.
डॉ. सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत असलेल्या या सभेत वसंतराव देशमुख यांची जीभ घसरली. देशमुख यांनी युवक काँग्रेस नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यानंतर जयश्री थोरात यांचे आत्ये भाऊ सत्यजीत तांबे यांनी सुजय विखेंवर हल्लाबोल करत वसंतराव देशमुख यांनाही सुनावले आहे.
सत्यजीत तांबे यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “सुजय विखे यांनी संगमनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली आहे. आज सुजय विखे यांच्या उपस्थितीत त्यांचे सर्वात जुने, सगळ्यात जवळचे व तालुक्यातील सगळ्यात मुर्ख म्हणून ओळखले जाणारे वसंत देशमुख यांनी आमची बहिण डॉ. जयश्री थोरात हिच्यावर टीका करताना जी पातळी सोडली, ती त्यांची खरी संस्कृती आहे.”
अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले की, काल संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. बाळासाहेब थोरात यांच्या कन्येविषयी ज्या पद्धतीने वसंतराव देशमुख नावाचे वृद्ध गृहस्थ बरळले ते संताप जनक आहे. भाऊ म्हणून आम्ही डॉ. जयश्री थोरात यांच्या पाठीशी खंबीर आहोत. राजकारण इतक्याही खालच्या पातळीवर जाऊ नये.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘भाजपचा पटका गळ्यात घातलेले नेते पुरोगामी महाराष्ट्रात जाहीरपणे ‘तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही’ अशी धमकी देतायत. हीच भाजपची मनुवादी मानसिकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलांबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे नेते महिलांचे रक्षण काय करणार? निवडणूक जिंकणे हा भाजपचा एकमेव अजेंडा आहे. त्यासाठी ते किती खालची पातळी गाठू शकतात हे उघड झालंय.
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे
सदर घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपाचे नेते वसंत देशमुख यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्रीताई थोरात यांच्या बाबतीत अतिशय गलिच्छ विधान केले. भरसभेत आपल्या मुलीच्या वयाच्या नेत्यावर अशा पद्धतीने गलिच्छ भाषेत टीका करण्यात आली, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
Web Title: Offensive comments about Jayashree Thorat, that’s his true culture
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study