राज्यातील या ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट, मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाची शक्यता- Rain Alert
मुंबई | Rain Alert: अनुकूल स्थितीमुळे मोसमी पावसाचे अंदमान, निकोबार बेटासह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात सोमवारी आगमन होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत मोसमी पाउस अंदमानात दाखल होईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. केरळ किनारपट्टीवर पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पुढील पाच दिवसांत जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसह परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना १६ ते १९ मे पर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा (येलो ॲलर्ट ) हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
Web Title: Nine Districts rain Alert thunderstorms with thunderstorms