विखेंची टूर अॅण्ड ट्रॅव्हल कंपनी बंद सामना मुखपत्रातून निशाणा
मुंबई: कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात एकमेकांवर टीका करण्याचा कलगीतुरा सुरु आहे. सत्तेसाठी लाचार प्रदेशाध्यक्ष आपण कधीच पहिले नव्हते असा टोला थोरातांना नाव न घेता विखे पाटील यांनी लगाविला होता.
यावर बाळासाहेब थोरातांनी विखेंवर निशाणा साधत मी विखे यांना मुख्यमंत्र्याच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे असा टोला लगाविला होता. यात आता सामना या मुखपत्रातून विखेंवर निशाणा साधण्यात आला आहे.
विखे हे अगोदर कॉंग्रेस पक्षात होते हा इतिहास आहे. वरचेवर पक्ष बदलणे ही कला त्यांना अवगत आहे. आधीच्या पक्षात राहून काय उद्योग केले यात सुद्धा ते पारंगत आहेत. विखेंची नेमकी पोटदुखी अशी झाली आहे की, थोरात हे सत्तेत आहे. ते त्यांचे प्रतीस्पर्धी आहेत. विखे अगोदर सत्तेसाठी भाजपकडे लीन झालेले आहेत. लाचारी व बेईमानी हे शब्द कोणी कोणासाठी वापरावेत हे समजणे गरजेचे आहे. विखे थोरात यांना लाचारी सारखे शब्द वापरतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक केले पाहिजे. विखे ज्या पक्षात जातात तेथे ते एकनिष्ठ नसतात असा टोलाही लगाविला आहे.
विखे हे सध्या कॉंग्रेस पक्षात नाही. ते ज्या पक्षात आहेत त्यांच्याविषयी बोलावे पण सत्ता नसेल तर पाण्याशिवाय तडपडणाऱ्या माशांप्रमाणे काही मंडळीची अवस्था झाली आहे. विखे या माशांचे प्रतिनिधी आहेत.
मूळ पक्षात सर्व काही भोगून सत्तेसाठी पक्षांतर करण्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. विखेंची टूर अॅण्ड ट्रॅव्हल कंपनी बंद पडली आहे मात्र त्यांची टूरटूर अजून सुरु आहे असा टोलाही विखे पाटील यांना लगाविला आहे.
Website Title: News Vikhe travel company closed saamna newspaper