या कारणामुळे अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने केली आत्महत्या
मुंबई: अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आज राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे सिनेमा इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
सुशांतच्या आत्महत्याने त्यांच्या कुटुंबीयावर दुखाचा डोंगर उभा राहिला आहे. त्याने आत्महत्या का केली याबाबत चर्चाना उधाण आले आहे. याप्रकरणी सुशांतच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
त्याच्या कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार सुशांत एका बंगाली मुलीमुळे त्रस्त होता. काही दिवसांतच तो आपल्या वडिलांना भेटणार होता मात्र दुर्दैवाने त्याने अगोदरच आत्महत्या केली आहे. सुशांतच्या घरच्यांनी न्यायालयीन चौकशी मागणी केली आहे.
दरम्यान मुंबई पोलिसांना घरातून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नसल्याचे स्पष्ट केलं आहे. सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्यात होता. सुशांत सिंग राजपूत यांच्या नोकराने पोलिसांना बोलावून त्यांच्या आत्महत्येची माहिती दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.
Website Title: News actor Sushant Singh Rajput committed suicide