अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी आठ महिन्याची गर्भवती
पाथर्डी(News): पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे ऑक्टोबर २०१९ मध्ये १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. पिडीत मुलगी ही आठ महिन्याची गर्भवती आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात पिडीत मुलीला दाखल करण्यात आले आहे. तिच्या फिर्यादीवरून कोरडगाव येथील पिरममंहद उर्फ पप्या अहमदभाई शेख याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार करणे प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोरडगाव येथील एक अल्पवयीन मुलगी ऑक्टोबर २०१९ मध्ये घरात एकटी असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास पप्या अहमदभाई शेख तिच्या घरात आला. तिला काहीतरी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले नंतर तिच्यावर अत्याचार केला. कोणाला काही सांगितल्यास घरातील सर्वाना ठार मारीन अशी धमकी दिली. नंतर मुलीने कोणाला काही सांगितले नाही.
आता मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे ती आठ महिन्याची गर्भवती असल्याची वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. याबाबत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपीला अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे.
Website Title: News Abuse of a minor girl Ahmednagar