पोलिसाला धक्काबुकी करत अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी
नेवासा: पोलीस दूरक्षेत्रासमोर मोटारसायकल लावू नको असे सांगितल्याचा राग एका पोलीसास शिवीगाळ व धक्काबुकी करून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. हि घटना तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस नाईक राहुल बबन यादव यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हंटले आहे की, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी प्रवरा संगम बाजारात पेट्रोलिंग करून पोलीस चौकी येथे आलो असता राजेंद्र केरू राजगुरू वय २४ रा. जवळके ता. नेवासा हा पोलीस चौकी समोर विनानंबरची मोटारसायकल लोकांना अडथळा होईल अशी लावत होता. त्यास मोटारसायकल लावू नकोस असे म्हंटले असता त्याच्या मनात राग येऊन अंगावर धावून येऊन गचांडी धरून सरकारी गणवेश फाडला व धक्काबुकी केली. माझ्या नादी लागशील तर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करील अशी धमकी दिली. यावरून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Nevasa Police push bangs atrocity