अकोले: त्या दाम्पत्याची हत्याच; दोघांना अटक जोडप्याचे मृतदेह एकमेकांना घट्ट मिठी मारून विहिरीत….
Breaking News | Akole: पती पत्नी जोडप्याचे मृतदेह एकमेकांना घट्ट मिठी मारून विहिरीत पाण्यात तरंगताना आढळून आले हत्या केल्याचे तपासात उघड बापासह सावत्र आईचे कृत्यः चौघांविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक.
अकोले : तालुक्यातील खिरविरे येथील आंबेविहीर वाडी शिवारात पती पत्नी जोडप्याचे मृतदेह एकमेकांना घट्ट मिठी मारून विहिरीत पाण्यात तरंगताना गुरुवारी ४ जुलै रोजी सायंकाळी आढळून आले, जोडप्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. पण नातेवाइकांनी हा घातपात असल्याचा आरोप केला. अन् पोलिस तपासात या जोडप्याची हत्या सख्खा बाप, सावत्र आईसह घरातीलच व्यक्तींनी केल्याचे समोर आले. वडील, सावत्र आई, भाऊ व आजोबा या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
बहिरू काळू डगळे (वय: २५) व सारिका बहिरू डगळे (वय: २२) असे मयत विवाहित जोडप्याची नावे असून दोन महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. दि.१ जुलै २०२४ रोजी हे जोडपे हरवल्याची तक्रार अकोले पोलिसांत दाखल होती. गुरुवारी तीन दिवसांनी डगळे यांच्या घराजवळच्या विहिरीतच दोघांचे एकमेकांना घट्ट मिठीने आवळू हात व कंबर कपड्यांनी बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले.
शरीरावरील जखमा, जमीन वादातून बाप लेकांचे होणारे वाद यासह काही कारणे ही संशयास्पद होती. त्यामुळे ही आत्महत्या नसून घातपात आहे. अशा प्रकारचे आरोप मुलाचे मामा एकनाथ कुलाळे यांनी केले होते. त्यानंतर कुलाळे यांच्या फिर्यादीनुसार काळू काशीनाथ डगळे, हिराबाई काळू डगळे, संतोष काशीनाथ डगळे आणि काशीनाथ लक्ष्मण डगळे (सर्व रा. खिरविरे, ता. अकोले) अशा चौघांवर अकोले पोलिसांनी दोघांचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस तपासात बाप आणि सावत्र आईने मुलगा आणि सुनेची नियोजनपूर्वक हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आपल्या मुलाच्या प्रॉपर्टीत पहिल्या बायकोचा मुलगा हक्कदार होऊ नये म्हणून हे कृत्य केल्याचे समोर येत आहे. हा घातपात नसून आत्महत्या आहे, असे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, मयत दोघांनी एकमेकांना घट्ट बांधले कसे?, मयताच्या आल्याने मयत बहिरू याचा पाडोशी येथील मामा एकनाथ कुलाळ व नातेवाईक यांनी जमीन प्रॉपर्टीसाठी घातपात केल्याचा आरोप केला.
Web Title: murder of that couple Both were arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study