Home महाराष्ट्र Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाचा झटका

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाचा झटका

Mumbai Sessions Court slaps former Home Minister Anil Deshmukh

Anil Deshmukh News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाचा झटका दिला आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची मागणीला न्यायालयाने विरोध केला आहे.  खासगी हॉस्पिटलऐवजी जे.जे. रुग्णालयात खांद्यावरील शस्त्रक्रियेस कोर्टानं परवानगी दिली आहे.  ईडीने (ED) सादर केलेला देशमुखांचा वैद्यकीय अहवाल निर्णायक ठरला आहे. खासगी रुग्णालयात उपचारांची गरज नसल्याचे तसेच जेजेतही उपचार होऊ शकतात, असं ईडीनं म्हटलं होतं.

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वैद्यकीय अर्जावर आज न्यायालयानं आपला निर्णय दिला आहे. अनिल देशमुख यांना खांदेदुखीचा त्रास आहे. त्यामुळे खांद्यावर  खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्यावी  अशी मागणी देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. जे.जे. रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे वाढते वय पाहता सरकारी रुग्णालयाऐवजी खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देशमुखांनी  न्यायालयाकडे केली होती.

मात्र ईडीनं याला विरोध केला होता. ईडीनं देशमुखांवर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचं सांगणारा अहवाल कोर्टात सादर केला होता. तसेच खासगी ऐवजी जेजेतही ही शस्त्रक्रिया होऊ शकते, असाही ईडीनं दावा केला होता.  अनिल देशमुख खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी ठाम होते. मात्र कोर्टानं त्यांना झटका दिला आहे. त्यांना जेजे रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्यास कोर्टानं परवानगी दिली आहे.

Web Title: Mumbai Sessions Court slaps former Home Minister Anil Deshmukh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here