Home अहिल्यानगर मुळा धरण जवळपास ‘इतके’ टक्के भरले

मुळा धरण जवळपास ‘इतके’ टक्के भरले

Breaking News  | Ahilyanagar Mula Dam: मुळा धरण काल शनिवार 2 ऑगस्ट रोजी जवळपास 90 टक्के भरल्याने लाभधारक क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

Mula Dam filled to almost 'this' percent

राहुरी: दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायनी म्हणून ओळखले जाणार्‍या मुळा धरण काल शनिवार 2 ऑगस्ट रोजी जवळपास 90 टक्के भरल्याने लाभधारक क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यापासून मुळाधरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने धरणाकडे पाण्याची आवक मंदावली आहे.

दरम्यान, काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मुळा धरणात 23 हजार 398 दलघफू (89.99टक्के) इतका पाणीसाठा होता. तर आवक 1 हजार 513 क्युसेसने सुरू होती.

मुळाधरणातून उजव्या कालव्याला 1100 क्युसेसने तर डाव्या कालव्याला 150 क्युसेसने आवर्तन सोडले आहे. दरम्यान यावर्षी कोतुळकडून मुळा धरणाते 14 हजार 517 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे.

Breaking News: Mula Dam filled to almost ‘this’ percent

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here