Home संगमनेर संगमनेरमध्ये गटारातील विषारी वायूमुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू तर दोघे जखमी;  धक्कादायक दुर्घटना

संगमनेरमध्ये गटारातील विषारी वायूमुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू तर दोघे जखमी;  धक्कादायक दुर्घटना

Breaking News | Sangamner: गटारात काम करत असताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर.

employee died due to toxic gas from the sewer in Sangamner

संगमनेर: संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज (गुरुवार, ११ जुलै) एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलशेजारी गटारात काम करत असताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली असून, कामाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अतुल रतन पवार असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव असून प्रकाश वसंत कोटकर व रियाज जावेद पिंजारी अशी जखमींची नावे असल्याची व जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपालिकेने हाती घेतलेल्या सांडपाणी व्यवस्थापन (STP) प्रकल्पांतर्गत शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्याचे काम सुरू आहे. आज कोल्हेवाडी रोडवरील कामादरम्यान एका कर्मचाऱ्याला गटारात श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या काही कर्मचाऱ्यांचा आणि स्थानिक नागरिकांचाही गटारात श्वास कोंडला गेला. यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला.

संगमनेर अपडेट : नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत कोल्हेवाडी रस्त्यावरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलशेजारी सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान गटारात काम करत असताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने गुदमरुन दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अतुल रतन पवार (वय 19) व रियाज जावेद पिंजारी (वय 22) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत. संगमनेर नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्याचे काम सुरू केले आहे. गुरुवारी कोल्हेवाडी रस्त्यावरील कामाच्यावेळी एका कामगाराला श्वास घेण्यास त्रास होवू लागला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या काही कामगारांचा आणि नागरिकांचाही गटारात श्वास कोंडला. यामुळे एकच गोंधळ उडाला.

गटारात बेशुद्ध पडलेले अतुल रतन पवार (वय 19, रा. संजय गांधीनगर, संगमनेर), रियाज जावेद पिंजारी (वय 22) व आणखी एक या तिघांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात हलवले. यातील अतुल पवार याचा उपचारापूर्वी तर रियाज पिंजारी याचा खासगी रुग्णालयात उपचारदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, इतर पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले. गटारात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तिघांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची तर अन्य दोघेजण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आ.खताळ यांचे मुख्याधिकारी व पोलिसांना निर्देश.

कोल्हेवाडी रोडवरील STP गटार सफाईचे काम सुरू असताना  अतुल रतन पवार हे मयत झाले असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधित कामाच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मयत झालेल्या पवार कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही आहोत तसेच दवाखान्यात उपचार घेत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचा खर्च नगरपालिका प्रशासनाने करावा असे प्रशासनास सांगितलेले आहे. मयत पवार कुटुंबियांना आर्थिक मदत शासनाकडून मिळवून देऊ. या घडलेल्या घटनेस दोषी असलेल्या भूमिगत गटाराच्या मुळ ठेकेदारासह मुश्ताक शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्याचे निर्देश आपण मुख्याधिकारी व पोलिस अधिकारी यांना दिले आहेत.   आमदार अमोल खताळ, सदस्य – संगमनेर विधानसभा

Breaking News: employee died due to toxic gas from the sewer in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here