अहिल्यानगर: एक वर्षाच्या चिमुकल्यासह आईने घेतला गळफास
Breaking News | Ahilyanagar Suicide: चिमुकल्यासह आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.
कर्जत: चिमुकल्यासह आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यातील खांडवी येथे बुधवारी (दि.२२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
साक्षी कुमार कांबळे (वय २३, रा. खांडवी, ता. कर्जत) व एक वर्षाचा मुलगा स्वरूप अशी मृतांची नावे आहेत. किशोर परशुराम कांबळे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. कुमार कैलास कांबळे हा खांडवी येथे राहतो. कुमार व साक्षीचा दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला. त्यांना एक वर्षाचा स्वरूप नावाचा मुलगा होता. त्याची सासू ताराबाई घोडके ही शेजारीच राहते. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास कुमार कांबळे व सासू ताराबाई घरात असलेल्या साक्षीला मोठमोठ्याने आवाज देत होते. त्यावेळी किशोर तेथे आला होता; परंतु साक्षी हिने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे खिडकीतून पाहिले असता साक्षी व मुलगा स्वरूप घराच्या पत्र्याच्या खालील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.
Web Title: mother hanged herself with her one-year-old child
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News